औरंगाबाद: गेल्या पाच वर्षांत भाजप-शिवसेना महायुतीच्या शासनाने कुठल्याच आश्वासनाची पूर्तता केलेली नसल्याने, समाजातील कुठलाच घटक सध्या शासनाच्या बाजूने नाही. त्यामुळे मतदारांचा कल काँग्रेस-राष्ट्रवादीकडे असून, या निवडणुकीत राज्यात आघाडीच्या जागा वाढतील, असा दावा काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार आ. सुभाष झांबड यांच्या प्रचारानिमित्त पाटील शहरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार एम. एम. शेख, अशोक सायन्ना, प्रकाश मुगदिया, डॉ. पवन डोंगरे आदींची उपस्थिती होती. पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी, नोकर्यांची घटत चाललेली संख्या, राफेल विमान खरेदी करार घोटाळा, मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षण, जीएसटी, महागाई, दुष्काळ आदी मुद्द्यांवरून शासनावर जोरदार हल्ला चढवला. चारा छावणी सुरू करायला पालकमंत्र्यांची परवानगी लागते काय? आता जनावरांनाही पक्षाचे लेबल लावायचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही आमच्या काळात सहा लाख जनावरे चारा छावणीत ठेवली होती, तर टंचाईग्रस्त भागात 7 हजार टँकरला परवानगी दिली होती. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, मुंबईत टिळक भवन येथे वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नगर येथे आघाडीच्या प्रचाराला जाणार नसल्याचे विखे म्हणाले होते. सध्या कचरा व पाणीप्रश्न अत्यंत गंभीर आहे. कचर्याच्या मुदद्यावरून तर शहराचे नाव देशात झळकले. औरंगाबाद मनपाला पाण्याचे नियोजनही करता येईना, अशी परिस्थिती असल्याचे ते म्हणाले.
खैरे यांचे कधी 20 मिनिटेही भाषण ऐकले नाही
गेल्या वीस वर्षांपासून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हे खासदार आहेत. या दोन दशकात सभागृहात त्यांनी वीस मिनिटेही भाषण कधी केल्याचे मी ऐकले नाही. दहा वर्षे सत्तेत असताना मंत्री राहूनही खैरे यांनी काय काम केले? असा सवाल उपस्थित करीत आज शहरातील उद्भवलेल्या परिस्थितीला खैरे जबाबदार असल्याचा आरोप पाटील यांनी केला. काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्याबाबत विचारले असता, सत्तार यांनी स्वतः पक्ष सोडल्याचे सांगितले आहे. त्याचा परिणाम स्थानिक निवडणुकीवर होईल असे वाटत नाही. पक्ष व्यक्तीवर चालत नाही. धोरणावर चालतो, अशा शब्दांत त्यांनी उत्तर दिले.
राज ठाकरे यांची सभा व्हावी
स्थानिक स्तरावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सभा घेण्यासाठी व सरचिटणीस प्रियंका गांधी यांना रोड शोकरिता विनंती करण्यात आलेली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा व्हावी, अशी मागणीही काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली असल्याचे पाटील यांनी सांगित